Home Dish ट्राय लेयर्ड खिचडी (dry layered Khichdi recipe in marathi)

ट्राय लेयर्ड खिचडी (dry layered Khichdi recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

ट्राय लेयर्ड खिचडी (dry layered Khichdi recipe in marathi)

#kr मुगाच्या डाळीची खिचडी पौष्टिक असल्याने लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मुगडाळीची खिचडी पौष्टिक आणि पचण्यास हलकी असते. ह्या खिचडीतून मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट, व्हिटामिन, कॅल्शिअम, फायबर, मॅग्नेशियम आणि पोटेशियम आपल्या शरीराला मिळतात. हे घटक आपल्या शरीरात ऊर्जेची निर्मिती करतात. अशा ह्या पौष्टिक खिचडीमधे मी २ प्रकारचे वेगळे प्रयोग करुन आणि त्याबरोबर साधी खिचडी पण बनवून हि ट्राय लेयर्ड खिचडी केली आहे. खूप छान लागते. नेहमीपेक्षा चवीत जरा बदल आणि पौष्टिकपणा वाढवणारी ही खिचडी नक्की करुन बघा.

Cooking instructions

* Step 1

प्रथम पिवळ्या लेयरसाठी एका कुकरमधे तेल तापवून त्यात जीरे, हिंग, हळद, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि लसूण घालून व्यवस्थित मिक्स करुन घ्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता तांदूळ आणि मुगाची डाळ धुवुन फोडणीत घालून परतावी. परतून झाल्यावर त्यात पाणी आणि मीठ घालून कुकरचे झाकण लावून शिट्ट्या करुन घ्याव्या. हा झाला पिवळी खिचडी लेयर तयार.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता व्हेजी खिचडी लेयरसाठी एका कढईत तेल तापवून त्यात हिंग आणि चिरलेले लसूण आणि कांदा घालून परतावे. मग त्यात जिरपूड, धणेपूड, मिरेपूड आणि ओरिगानो घालावे. मग त्यात चिरलेल्या हिरव्या, पिवळ्या आणि लाल सिमला मिरच्या घालाव्या. मग मक्याचे दाणे घालून सर्व एकत्र करुन शिजवावे. मग मीठ घालावे. आता ह्या भाज्यांच्या मिश्रणात पिवळ्या खिचडीमधली थोडी खिचडी घालून सर्व नीट मिक्स करुन घ्यावे. हा झाला व्हेजी खिचडी लेयर तयार.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता हिरव्या लेयरसाठी शिजवलेली पालकाची पानं, कोथिंबिर, पुदिन्याची पानं, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि लसूण घालून मिक्सरमधे पेस्ट करुन घ्यावी.
Image step 4 Image step 4

* Step 5

आता त्याच कढईत परत तेल तापवून त्यात हिंग आणि चिरलेला लसूण घालून परतावे. मग त्यात मटार घालून मिक्स करावे आणि झाकण लावून मटार शिजवून घ्यावे. आता त्यात तयार हिरवी पेस्ट आणि पाणी घालावे आणि एक उकळी आणावी. मग त्यात मीठ आणि तयार पिवळ्या खिचडीमधली थोडी खिचडी घालून सर्व काही नीट मिक्स करुन घ्यावे. हा झाला हिरवी खिचडी लेयर तयार.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

आता एका भांड्याच्या तळाशी थोडे पाणी लावून त्यात प्रथम व्हेजी खिचडी, मग हिरवी खिचडी आणि मग पिवळी खिचडी घालावी आणि दाबून सारखी करुन घ्यावी आणि त्याची मुद पाडून सजवून सर्व्ह करावी ट्राय लेयर्ड खिचडी.
Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic