Home Dish पालक व मक्याचा रवा ढोकळा

पालक व मक्याचा रवा ढोकळा

Introduce

Chef :

Pooja M. Pandit

पालक व मक्याचा रवा ढोकळा

#ब्रेकफास्ट ढोक, हा गुजरात व त्याच्या बाजूच्या काही राज्यातील एक खाद्यपदार्थ आहे. मुळात ढोकळा हा तांदूळ व डाळीचं पीठ तिंबवून बनवला जातो. इथे मी रव्याचा झटपट बनणारा ढोकळा दाखवला आहे व त्याची पौष्टिकता वाढवायला त्यात पालक व मका घातला आहे. मक्याने ढोकळ्याची चव उभरून येते व मुलांना देखील लूभावते.

Ingredient

Food ration :

Cooking time :

१५
२ टीस्पून

साखर

3 टेबल३स्पून

तेल

१ टीस्पून

राई

१/४ टीस्पून

हिंग

१ टीस्पून

तीळ

Cooking instructions

* Step 1

प्रथम पालक निवडून घ्या व कोवळे देठ ही नक्की वापरा. ही पाने मिठाच्या पाण्यात, किमान २० मिनीट भिजवून ठेवा. नंतर ही पाने परत धुऊन निथळत ठेवा.
Image step 1

* Step 2

पुढे, रवा व दही एकत्र करून १० मिनिटे भिजत ठेवा.
Image step 2 Image step 2

* Step 3

त्यादरम्यान, पालक, मिरच्या, साखर व आले वाटून घ्या व रव्याच्या मिश्रणात एकजीव करा. २ टीस्पून पाणी व मक्याचे दाणे (थोडे सजावटीसाठी शिल्लक ठेवा) त्यात घाला व एकजीव करा. हे मिश्रण १५ मिनिटे भिजत ठेवा.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

ढोकळा बनवण्यासाठी एका कढईत किव्वा पातेलीत साधारण २" पातळी इतपत पाणी घालून गरम करत ठेवा व एक पसरट पातेलीला आतून चांगले तेल चोळून घ्या.

* Step 5

रव्याच्या मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून त्यावर १ टीस्पून पाणी घाला. लगेच त्याला फेस येईल. हे अलगद रव्याच्या मिश्रणात एकजीव करा व लगेच तेल चोळलेल्या पातेलीत ओता. त्यावर उरलेले मक्याचे दाणे पेरा.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

कढईत एक स्टॅन्ड ठेवा व पातेली त्यावर ठेवा. पातेलीचा तळ पाण्याच्या वर पाहिजे व त्याला शिवला नाही पाहिजे.

* Step 7

पुढे, कढई झाकून ढोकळा मोठ्या आचेवर १५ मिनिटे वाफवून घ्या. नंतर, ढोकळ्लाचे समान तूकडे करुन घ्या.
Image step 7

* Step 8

आता तेलाची फोडणी करुन घ्या व त्यात राई घाला. ती तडतडली की त्यात हिंग, तिळ व मिरच्या घालून परतवा व लगेच ती ढोकळ्यावर ओता.
Image step 8 Image step 8

* Step 9

हा पौष्टिक व चविष्ट पालक व मक्याचा रवा ढोकळा कोथिंबीर व पुदिना हिरव्या चटणी सोबत नाश्त्याला वाढा.
Image step 9

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic