सोप्पा अंड्याचा रस्सा
Introduce
Chef :
Pooja M. Pandit
सोप्पा अंड्याचा रस्सा
#पहिलीरेसीपी ..... हा अंड्याचा रस्सा एक अतिशय सोप्पा पदार्थ आहे. हा चवीला आंबट गोड आहे व ज्यांना तब्येतीच्या तक्रारी मुळे खोबरं वर्ज्य आहे, त्यांच्यासाठी तर हा उत्तमच आहे. तर पाहूया, ह्या आगळ्यावेगळ्या रस्स्याची कृती!
Ingredient
Food ration :
३ सर्व्हिंग्ज
Cooking time :
२५ मिनिटे
Cooking instructions
* Step 1
सर्वप्रथम, भरपूर पाण्यात अंडी उकडून घ्या. त्यासाठी, पाण्यात १/४ टीस्पून मीठ घालून, उकळी आल्यावर, अंडी बरोबर १२ मिनीट शिजवा व लगेच गरम पाण्यातून काढून साध्या पाण्यात बुडवा.
* Step 2
त्याचबरोबर, सुक्या मिरच्या साधारण १/२ ताय गरम पाण्यात भिजत ठेवा.
* Step 3
कांदे, टोमॅटो, मिरच्या, धणे व मिरी, बिना पाण्याचे मिक्सर मधून वाटून घ्या.
* Step 4
रस्सा बनवण्यासाठी, एक पातेलं तापवायला ठेवा व त्यात तेल घाला. तेल गरम होताच, त्यात वाटण व हळद घाला व चांगले परतवून घ्या.
* Step 5
आता, त्यात काश्मिरी लाल मिरची पावडर, साखर, व्हिनेगर व मीठ घालून एकजीव करा. साधारण १/२ कप पाणी घालून उकळी आणा.
* Step 6
झाकण ठेवून ७-८ मीन शिजवा. रस्सा खाली लागु नये म्हणुन मध्ये मध्ये ढवळत रहावे. हा रस्सा जरा घट्टच ठेवा.
* Step 7
कांदा टोमॅटो पेस्ट शिजली, की उकडलेली अंडी अर्धी करून रस्स्यात सोडा व भरपूर कोथिंबीर घालून सजवा.
* Step 8
हा चविष्ट अंड्याचा रस्सा, गरमागरम पोळी किव्वा भाजलेल्या पावाबरोबर जेवायला वाढा!
Note: if there is a photo you can click to enlarge it
10 Pieces Of Expert Nutrition Advice
1. Start Small
2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens
3. Focus on Adding—Not Subtracting
4. Taste the Rainbow
5. Prioritize Potassium
6. Eat More Plants
7. Focus on Your Immune System
8. Try the Mediterranean Diet
9. Understand the Impact of Food
10. Guard Your Gut
See more