मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
Introduce
Chef :
Prachi Phadke Puranik
मिक्स स्प्राऊट्स सॅलड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp कडधान्ये मोड आणून खाण्याची पध्दत खरोखरच आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रथिने पचायला सोपी होतात. जीवनसत्वांची दुप्पट-तिप्पट वाढ होते. क जीवनसत्व तर मोड आल्यानंतरच तयार होते. कडधान्यांचा वातूळपणा कमी होतो लोह व कॅल्शियमचे शोषण चांगले होते. मोड आणण्याच्या प्रक्रियमध्ये प्रथिने आणि कर्बोदकांची पाचकता लक्षणीय प्रमाणात वाढते. यातील कर्बोदकांची पाचकता दुपटीने वाढते आणि प्रथिनांची पाचकता जवळजवळ सव्वा पटीने वाढते. प्रथिने, खनिजे, जीवनसत्वे आणि कर्बोदके यांचा एक समृध्द खजीना मोड आलेली कडधान्ये. अशा मोड आलेल्या कडधान्यांचा दैनंदिन आहारातील समावेश वेगवेगळ्या प्रकारे करावा म्हणून हे सॅलड मी केलय. चवीला चटपटीत आणि आरोग्यासाठी पौष्टिक.
Ingredient
Food ration :
३ सर्व्हिंगज
Cooking time :
२० मिनीटं
Cooking instructions
* Step 1
प्रथम मिक्स कडधान्य कुकरमधे शिजवून घ्यावे.
* Step 2
शिजलेल्या कडधान्यामधे चिरलेला कांदा, टोमॅटो, चाट मसाला,बारिक चिरलेली हिरवी मिरची घालून सर्व नीट मिक्स करुन घ्यावे.
* Step 3
आता त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबिर घालून सगळं छान एकजीव करुन सॅलड सर्व्ह करावे.
Note: if there is a photo you can click to enlarge it
10 Pieces Of Expert Nutrition Advice
1. Start Small
2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens
3. Focus on Adding—Not Subtracting
4. Taste the Rainbow
5. Prioritize Potassium
6. Eat More Plants
7. Focus on Your Immune System
8. Try the Mediterranean Diet
9. Understand the Impact of Food
10. Guard Your Gut
See more