Home Dish इटालियन स्टाइल गार्लिक सुप (italian garlic sup recipe in marathi)

इटालियन स्टाइल गार्लिक सुप (italian garlic sup recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

इटालियन स्टाइल गार्लिक सुप (italian garlic sup recipe in marathi)

#रेसिपीबुक #week5 लसूण एक असा पदार्थ आहे जो आहारात विशेषत: पावसाळ्यात वाढवायला हवा. लसूण अँटीऑक्सिडेंट्सने भरलेले आहे जे आपली प्रतिकारशक्ती वाढवते. लसूण चयापचय दर देखील स्थिर ठेवते. स्वयंपाक करताना, पावसाळ्यात सामान्य सर्दी आणि फ्लू टाळण्यासाठी लसणाचा वापर जास्त प्रमाणात करावा. कधीही आपण जेवणाची सुरुवात सुप ने करतो आणि पावसाळ्यात गरमागरम सुप म्हणजे पर्वणीच. बाहेर धो धो पडणारा पाऊस आणि घरात गरमागरम सूप. पावसाळ्याचा हा आनंद या सुप बरोबर नक्की अनुभवून बघा.

Cooking instructions

* Step 1

एका कढईत तेल किंवा बटर घेऊन त्यात अनुक्रमे कांदा, लसूण आणि टोमॅटो घालून परतावा. मग बटाट्याच्या फोडी घाला.
Image step 1 Image step 1

* Step 2

सगळं नीट परतून झाल्यानंतर व्हेजिटेबल स्टॉक किंवा पाणी, ओरिगानो आणि मीठ घाला. २० ते २५ मिनीटं उकळू द्या.
Image step 2

* Step 3

२५ मिनीटं झाल्यानंतर भाज्या मिक्सरमधे घालून फिरवा.
Image step 3

* Step 4

आता मिक्सरमध्ये फिरवलेले मिश्रण परत कढईत काढून त्यात साय, किसलेलं चीज आणि गरजेनुसार पाणी घालून गरम करा आणि गरमगरम सर्व्ह करा इटालियन स्टाइल गार्लिक सुप.
Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic