Home Dish ऑमलेट करी (omlette recipe in marathi)

ऑमलेट करी (omlette recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

ऑमलेट करी (omlette recipe in marathi)

#worldeggchallenge अंड्याचा पदार्थ करायचं चॅलेंज आल्या दिवसापासून मी अंड्याचे काय काय पदार्थ करता येतील याचा विचार करत होते. पण वेगळं असं काही सुचत नव्हतं. एकदोन प्रयोग पण करुन झाले. पण छे क‍ाही नीट होत नव्हतं. मग मनात विचार आला अंडा करी केली जाते तशी ऑमलेटची करावी. मग ऑमलेटमधे थोडी इटालियन चव आणली आणि करीमधे कांदालसणाचा फ्लेवर आणला आणि केली ऑमलेट करी.

Ingredient

Food ration :

५ सर्व्हिंगज

Cooking time :

५० मिनीटं
1 टीस्पून

कोथिंबिर

1 टीस्पून

ओरिगानो

1 टीस्पून

चिलीफ्लेक्स

चवीनुसार

मीठ

2 टेबलस्पून

तेल

1 टेबलस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

गरम मसाला

1 टीस्पून

जिरं

1/2 टीस्पून

मोहरी

1/2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

Cooking instructions

* Step 1

प्रथम सुकं खोबरं, कांदे, हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या गॅसवर भाजून घेणे आणि गार करुन वाटून घेणे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

ऑमलेटसाठी एका भांड्यात चिरलेला कांदा,चिरलेली हिरवी मिरची, ओरिगानो,कोथिंबिर,चिलीफ्लेक्स, आलं लसूण पेस्ट, ४ अंडी फोडून, काळीमिरी पावडर आणि मीठ घालून मिक्स करणे. पॅनमधे तेल गरम करुन वरील मिश्रण त्यात घालून ऑमलेट दोन्ही बाजूनी भाजून घेणे. ऑमलेटचा पॅन शक्य तितका छोटा असणे आवश्यक आहे.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

करीसाठी एका कढईत तेल गरम करुन त्यात जिरं, मोहरी,हळद, हिंग,चिरलेला लसूण,कोथिंबिर,तमालपत्र,लवंगा, दालचिनी, काळीमिरी घालून परतणे आणि मग टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतणे. मग त्यात कांदा खोबर्‍याची तयार पेस्ट,गरम मसाला,लाल तिखट,पाणी आणि मीठ घालून सर्व एकजीव करणे आणि उकळी आणणे.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता तयार ऑमलेटच्या वड्या पाडून त्या तयार करीमधे सोडून गरमागरम सर्व्ह करणे.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic