Home Dish आलू चटणी पुलाव (aloo chutney pulao recipe in marathi)

आलू चटणी पुलाव (aloo chutney pulao recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

आलू चटणी पुलाव (aloo chutney pulao recipe in marathi)

#उत्तर आलू चटणी पुलाव ही भारतीय हरियाणा राज्यातील तांदूळची एक सामान्य डिश आहे. हा एक खूप चवदार पदार्थ आहे जो तांदूळ,बटाटे आणि हिरवं वाटण घालून शिजवला जातो. मसालेदार चटणी भातामधे चव आणि रंग दोन्ही आणते. ऑफिसमधे दुपारच्या जेवणासाठी झटपट करुन नेता येण्यासारखा हा पदार्थ आहे किंवा घरात भाजी नसेल किंवा सगळा स्वयंपाक करण्यासाठी वेळ नसेल किंवा कंटाळा आला असेल किंवा अचानक पाहुणे आले तर आमटी भाताऐवजी हा एक छान पर्याय होऊ शकतो. हल्ली वन पाॅट मिलची पद्धत आहे त्यालाही हि रेसिपी पुरक आहे. चवीला खूप छान असणारी हि रेसिपी नक्की करुन बघा.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

२५ मिनीटं
3 कप

पाणी

2 टेबलस्पून

साजूक तुप

1 टेबलस्पून

ड्राय पुदिना

2 टीस्पून

बडीशेप

Cooking instructions

* Step 1

प्रथम बटाट्याची सालं काढून त्याच्या फोडी करुन पाण्यात ठेवाव्या. मिक्सरमधे कोथिंबिर,पुदिना,आलं,लसूण,हिरवी मिरची,बडीशोप आणि पाणी घालून चटणी वाटून घ्यावी.
Image step 1 Image step 1

* Step 2

कुकरमधे तुप घालून ते गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, लवंगा आणि दालचिनी घालून परतावं.
Image step 2

* Step 3

बटाट्याचं पाणी निथळून त्यात तयार चटणी घालावी. बटाट्याच्या फोडींना चटणी लावून घ्यावी. आणि फोडणीत बटाट्याच्या फोडी घालून छान परतून घ्याव्या.
Image step 3 Image step 3

* Step 4

मग त्यात धुतलेले तांदूळ घालून त्यावर उरलेली चटणी घालावी आणि सर्व नीट एकत्र परतून घ्यावे.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

मग त्यात पाणी व मीठ घालून ढवळावे आणि कुकरचे झाकण बंद करुन २ ते ३ शिट्ट्या कराव्या. खायला तयार आलू चटणी पुलाव.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic