Home Dish वेज कटलेट्स

वेज कटलेट्स

Introduce

Chef :

Pooja M. Pandit

वेज कटलेट्स

#न्यूइयर #teamtrees #onerecipeonetree पार्टी म्हंटलं की काही तरी चमचमीत पाहिजेच. व ते आधीच बनवून ठेवता आले तर ऐन वेळी पाहुण्यांना सर्व करणे सोप्पे जाते. हे वेज कटलेट्स आधीच बनवून डीप फ्रीज केले, तर पार्टीच्या वेळी पटकन तळून देता येतात. चवीला मस्तच लागतात व पोटही भरतच! तर मग पाहुया ह्याची कृती.

Ingredient

Food ration :

Cooking time :

४-५ मिनीटे

Cooking instructions

* Step 1

सर्वप्रथम, अंदाजे ३/४ कप पाणी उकळत ठेवा व त्यात मध्यम आचेवर फ्लॉवर, मटार व गाजर शिजवा व पाणी निथळून घ्या.

* Step 2

एका पॅन मध्ये तेल तापवून त्यात हिरव्या मिरच्या घाला व त्यावर कांदा टाकून पारदर्शक होईस्तोवर शिजवा. पुढे, आले लसुण पेस्ट घालून चांगले शिजवा.

* Step 3

त्यात हळद व चिरलेल्या सिमला मिरच्या घाला व काही मिनिटे शिजवा. त्यात उकडलेल्या सर्व भाज्या, लाल तिखट व मीठ घालून एकजीव करा व मोठ्या आचेवर, मिश्रण सुके पर्यंत परतवून घ्या.

* Step 4

सर्व भाज्या चेचून घ्या व त्यात गरम मसाला घालून एकजीव करा.

* Step 5

मिश्रण थंड झाले की मग त्यात उकडलेला बटाटा व रताळं, चिरलेली कोथिंबीर व पावाचा चुरा घालून एकजीव करून घ्या.

* Step 6

गरजेनुसार मीठ घाला व तुमच्या मर्जिच्या आकाराचे कटलेट्स बनवा. साधारण १०-१५ मिनिटे कटलेट्स फ्रीज मध्ये ठेवा, जेणेकरून ते थोडे घट्ट होतात.

* Step 7

त्यादरम्यान, पीठ व पाणी एकत्र करून घ्या व पातळसा घोळ बनवा. रवा एका पसरट ताटलीत पसरवून घ्या.

* Step 8

कटलेट्स ह्या घोळात बुडवून मग रव्यात चांगले घोळवून घ्या. ते परत थोडे घट्ट होण्याकरिता २०-३० मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा.

* Step 9

तव्यावर तेल तापवून त्यात हे कटलेट्स दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत, तळून घ्या व टिश्यू पेपर वर काढून घ्या.

* Step 10

न्यू इयर पार्टीला हे चविष्ट वेज कटलेट्स टोमॅटो सॉस व हिरव्या चटणी सोबत सर्व करा!

Note: if there is a photo you can click to enlarge it

Tag

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic