Home Dish कट वडा (kat wada recipe in marathi)

कट वडा (kat wada recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

कट वडा (kat wada recipe in marathi)

#KS3 विदर्भातील प्रसिद्ध रेसिपी कट वडा. झणझणीत कट आणि चविष्ट बटाटे वडा हे न आवडणारं काँबिनेशन असूच शकत नाही. खूप दिवस मनात इच्छा होती हि रेसिपी करायची, पण करु करु म्हणून टाळलं जात होतं. आज विदर्भ रेसिपी निमित्त हि रेसिपी मी करुन बघितली.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

१ तास
1 टेबलस्पून

तेल

2 टीस्पून

मोहरी

1 टीस्पून

जिरं

1/2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

1 टेबलस्पून

आलं लसूण पेस्ट

1 टेबलस्पून

कोथिंबिर

चवीनुसार

मीठ

1/2 कप

बेसन

1 टेबलस्पून

तांदूळ पीठ

1/4 टीस्पून

ओवा

1 टीस्पून

धणे

2 टीस्पून

गरम मसाला

1 टेबलस्पून

सुकं खोबरं

2 टीस्पून

लाल तिखट

Cooking instructions

* Step 1

प्रथम कटासाठी कढईत तेल घेऊन ते तापलं की त्यात धणे, जिरं,लवंग, वेलच्या घालाव्या. मग त्यात कांदा, लसूण आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्यावं.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

हे सगळं शिजल्यावर त्यात खोबरं, लाल तिखट आणि गरम मसाला घालून सगळं मिक्स करुन घ्यावं आणि परतावं. गार झाल्यावर थोडं थोडं पाणी घालून मिक्सरमधे फिरवून घ्यावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता परत त्याच कढईत तेल घेऊन त्यात हळद, हिंग घालावं. आणि तयार वाटण घालून परतावं. मग त्यात पाणी आणि मीठ घालावं आणी एक उकळी आणावी. हा झाला कट तयार.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता वड्यासाठी एका कढईत तेल तापवून त्यात जिरं, मोहरी घालावी. मग त्यात ठेचलेलं लसूण आणि मिरचीचं वाटण आणि कढीपत्ता घालावा. मग त्यात किसलेले बटाटे घालावे. आणि मीठ, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबिर घालून सर्व नीट मिक्स करावं. आणि वड्याचा शेप द्यावा.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

आता वड्याच्या कव्हरसाठी बेसन,तांदूळ पीठ,हळद,ओवा आणि मीठ घालावं आणि मिक्स करावं. तेल गरम करुन त्याच मोहन घालावं.आता ते मिक्स करुन त्यात पाणी घालून पीठ भिजवावं.
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

आता तयार बटाट्याचे गोळे तयार बेसन पीठात बुडवून गरम तेलात सोडून वडे तळून घ्यावेत. एका प्लेटमधे तळलेले वडे घेऊन त्यावर तयार कट घालून कच्चा कांदा, शेव आणि कोथिंबिर भुरभुरवून गरमागरम सर्व्ह करावा कट वडा.
Image step 6 Image step 6 Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic