रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
Introduce
Chef :
Prachi Phadke Puranik
रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)
#स्नॅक्स ढोकळा हा भारतातील गुजरात प्रांतांमधील एक शाकाहारी पदार्थ आहे. खरंतर हा पदार्थ तांदूळ आणि चणाडाळीच्या आंबवलेल्या मिश्रणापासून बनवला जातो. पण हल्ली इंस्टंटचा जमाना आहे. एवढा वेळ नसतो थांबायला. ढोकळा खायची इच्छा झाली कि लगेच हजर पाहिजे. तसं बाहेर सगळं मिळतंच पण घरी करुन खायची गम्मत वेगळीच असते. म्हणून ह्या झटपट होणार्या रवा ढोकळ्याची रेसिपी आज शेयर करते.
Ingredient
Food ration :
३ सर्व्हिंगज
Cooking time :
४५ मिनीटं
Cooking instructions
* Step 1
प्रथम रव्यामधे दही, साखर, ठेचलेलं आलं लसूण, मीठ आणि तेल घालून सगळं एकत्र मिक्स करुन घ्यावं.
* Step 2
आता रव्याच मिश्रण ३० मिनीटं झाकून ठेवावं. ३० मिनीटांनी मिश्रण जरा पाणी घालून ढवळावं आणि त्यात इनो घालावं. इनो घातल्यावर त्याला अ ॅक्टिवेट करण्यासाठी त्यावर थोडं पाणी घालावं. इडलीच्या बॅटरप्रमाणे मिश्रण करावं.
* Step 3
आता एका भांड्याला तेलाने ग्रीस करुन घ्यावं. त्यात तयार मिश्रण ओतून कुकरमधे १५ ते २० मिनीटं वाफवावं आणि गार झाल्यावर तुकडे करावे.
* Step 4
एका छोट्या कढईत तेल गरम करुन मोहरी, जिरं, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून फोडणी करावी. आणि फोडणी गार झाल्यावर तयार ढोकळ्यावर फोडणी ओतावी. आवडीच्या चटणीबरोबर रवा ढोकळा सर्व्ह करावा.
Note: if there is a photo you can click to enlarge it
10 Pieces Of Expert Nutrition Advice
1. Start Small
2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens
3. Focus on Adding—Not Subtracting
4. Taste the Rainbow
5. Prioritize Potassium
6. Eat More Plants
7. Focus on Your Immune System
8. Try the Mediterranean Diet
9. Understand the Impact of Food
10. Guard Your Gut
See more