Home Dish इंद्रहार कढी (kadhi recipe in marathi)

इंद्रहार कढी (kadhi recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

इंद्रहार कढी (kadhi recipe in marathi)

#पश्चिम #मध्यप्रदेश इंद्रहार ही मध्य प्रदेशातील बुंदेलखंडची एक पारंपारिक रेसिपी आहे. या पाककृती बद्दल अशी कहाणी आहे की, “ही देवांचा राजा भगवान इंद्र यांना प्रसन्न करण्यासाठी केली जाते." अतिशय पौष्टिक असणारी हि रेसिपी मला भावली. त्यात ५ प्रकारच्या डाळींचा वापर केला जातो. हा पदार्थ २ प्रकारे खाल्ला जाऊ शकतो. एकतर नाश्ता म्हणून किंवा पोळीशी व्यंजन म्हणून. अतिशय सोपी रेसिपी आहे. नक्की करुन बघा.

Ingredient

Food ration :

६ सर्व्हिंगज

Cooking time :

१ तास
2 टीस्पून

कोथिंबिर

1 इंच

आलं

1/4 टीस्पून

हळद

1 टीस्पून

लाल तिखट

2 टीस्पून

गरम मसाला

1 टीस्पून

जिरं

चिमुटभर

हिंग

1 कप

दही

4 कप

पाणी

3 टेबलस्पून

बेसन

2 टेबलस्पून

साजूक तुप

1 टीस्पून

साखर

Cooking instructions

* Step 1

सर्व डाळी स्वच्छ धुवुन रात्रभर पाण्यात भिजवून ठेवाव्यात. सकाळी पाणी निथळून घ्यावं.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता डाळी मिक्सरमधे वाटाव्या. डाळी वाटताना त्यात कोथिंबिर, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण घालावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता वाटलेल्या मिश्रणात लाल तिखट, गरम मसाला, हळद, हिंग, जिरं आणि मीठ घालून सर्व नीट एकत्र करुन घ्यावं.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता ढोकळा स्टँडच्या ताटल्यांना तेल लावून तयार मिश्रण त्यात ओतुन २० मिनीटं वाफवून घ्या.
Image step 4 Image step 4

* Step 5

आता वाफवलेल्या मिश्रणाच्या वड्या पाडून त्या गार झाल्यावर तेलामधे तळून घ्या. खूप डीपफ्राय करायचं नाही. हा झाला इंद्रहार तयार.
Image step 5 Image step 5

* Step 6

कढीसाठी एका पातेल्यात तुप घेऊन ते तापल्यावर त्यात जिरं, कढीपत्ता, ठेचलेला लसूण, हिंग, हळद, किसलेलं आलं, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि चिरलेली कोथिंबिर घालावी.
Image step 6 Image step 6

* Step 7

एका भांड्यात दह्यात पाणी घालून ताक करुन घ्यावे आणि त्यात बेसन घालून नीट कालवून घ्यावे. आणि तयार फोडणीत बेसन लावलेले ताक घालावे आणि आवश्यक वाटल्यास पाणी घालावे आणि मीठ व साखर घालून ढवळावे आणि उकळी आणावी. ही झाली कढी तयार.
Image step 7 Image step 7

* Step 8

आता एका डिशमधे कढी वाढून त्यावर तयार इंद्रहार ठेवावे आणि गरम गरम सर्व्ह करावी इंद्रहारची कढी.
Image step 8 Image step 8

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic