Home Dish मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)

मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

मुळ्याची कोशिंबिर (mulyachi koshimbir recipe in marathi)

#रेसिपीबुक #week7 मुळा ही एक कंद प्रकाराची भाजी आहे. मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्येही आपल्या शरिराला आवश्यक असे पोषक घटक असतात. मुळ्याचा समावेश आयुर्वेदिक औषधी वनस्पतींमध्ये करण्यात येतो. मुळ्यात प्रथिनं, कर्बोदकं, लोह, फॉस्फरस मोठ्या प्रमाणावर असते. मुळ्यामध्ये उष्ण गुणधर्म असून पावसाळ्यात अथवा हिवाळ्यात शरिराला उष्णता मिळण्यासही मुळ्याचा उपयोग होतो. रोजच्या जेवणात कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते तसेच अन्नाचे पचनही व्यवस्थित होते. सर्दी होणे, घसा खवखवणे किंवा सायनससारख्या समस्येवरदेखील उत्तम उपाय म्हणून मुळ्याचा वापर होतो. मुळ्याचा आहारात समावेश केल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो. तसेच किडणीचे विकार, कावीळ, डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे या विकारांवरही मुळा खाणे उपयुक्त आहे. रक्ताभिसरण सुरळीत होणे तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठीही मुळा खाल्याने मदत होते. मुळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनाही यामुळे लाभ होतो. त्वचेसाठीही मुळा आरोग्यवर्धक ठरतो. मुळा किंवा त्याची पाने खाल्ल्यास बॉडीचे टॉक्सिन दूर होऊन त्वचा उजळण्यास मदत होते. मुळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. त्यामुळे मुळ्याच्या सेवनाने सांधेदुखी दूर होते. तर अशा या बहुगुणी मुळ्याची कोशिंबिर आज तुमच्यासाठी खास.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

१० मिनीटं
1/4 टीस्पून

साखर

1/4 टीस्पून

मोहरी

1/4 टीस्पून

जिरे

चिमूटभर

हिंग

1/4 टीस्पून

हळद

चवीनुसार

मीठ

1 टेबलस्पून

तेल

Cooking instructions

* Step 1

प्रथम मुळा किसून घ्यावा. मग त्यात दही, मीठ आणि साखर घालावी.
Image step 1 Image step 1

* Step 2

आता एका छोट्या लोखंडी कढईत तेल घेऊन ते तापल्यावर त्यात अनुक्रमे मोहरी, जिरे, हळद आणि हिंग घालावे. मग त्यात चिरलेली कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर घालून मिक्स करावे.
Image step 2

* Step 3

आता दही, किसलेला मुळा, मीठ आणि साखर एकजीव करून त्यावर तयार फोडणी ओतावी. आणि छान एकत्र करून घ्यावे. खायला तयार मुळ्याची कोशिंबिर.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic