Home Dish कोकम सार(kokam saar recipe in marathi)

कोकम सार(kokam saar recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

कोकम सार(kokam saar recipe in marathi)

#रेसिपीबुक #week2 गावच्या आठवणीत एक आठवण म्हणजे कोकम सार ही आमच्याकडची पारंपरिक पाककृती आहे.आमच्या कोकणात वाडीत कोकमाचे झाड हे असतेच त्यामुळे ताजे कोकम आणि त्याच बनवलेलं सार आणि ते ही आजी, मामी च्या हातच म्हणजे भारीच, कोकम सार आमच्या कडे शाकाहारी असो वा मावसाहाराचे बेत कोकम सार हे असतेच,लग्न, पूजेत ही पंगतीला जेवणात सार हे असतेच आठवण म्हणून मीही हे सार पोस्ट करत आहे तर पाहूया कोकम सार ची पाककृती.

Ingredient

1 टीस्पून

जिरे

1/2 टीस्पून

हिंग

1 टीस्पून

राई

1/2 टीस्पून

हळद

चवीनुसार

मीठ

आवश्यकते नुसार

पाणी

1 टेबलस्पून

तेल

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका पातेल्यात पाणी आणि कोकम घालून उकळून घ्यावे. एकीकडे लसूण, मिरची, जिरे ठेचून घ्यावे.
Image step 1

* Step 2

आता किसलेला नारळ मिक्सर च्या भांड्यात घालून बारीक वाटावे नन्तर एका भांड्यात गाळणीने गाळून घ्यावे, पुन्हा थोडं पाणी घालून वाटावे आणि गाळून घ्यावे आणि पुन्हा एकदा असे करून गाळून घ्यावे.आपले नारळाचे दूध तयार.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता उखडलेल्या कोकमांना एका भांड्यात गाळून घावें त्यात गूळ घालून मिक्स करावे.
Image step 3

* Step 4

आता एका कढईत तेल गरम करून राई, जिरे तडतडू द्यावे, मग कडीपत्ता, हिंग, हळद आणि ठेचा घालून परतावे मग कोकम गुळाचा पाणी घालून उकळी आणावी मग गॅस मंद आचेवर करून नारळाचे दूध घालावे 2 मिनिटाने गॅस बंद करून कोथिंबीर घालावी.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

कोकम सार तयार आहे हे सार पचनासाठी उत्तम आहे, हे सार भात, चपाती सोबत खायलाही छान लागते.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic