Home Dish शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

शेवभाजी (sev bhaji recipe in marathi)

#KS4 आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या प्रांतात अनेक वेगवेगळ्या पाककृती आहेत त्यावरून आपली खाद्यसंस्कृती किती अफाट आहे ते कळते. प्रत्येक प्रांतात बऱ्याच पाककृतींमध्ये साम्य आहे. पण तरीही त्या-त्या प्रांताची एक वेगळी खासियत त्या पाककृतीत आहे. म्हणूनच तीचा वेगळेपणा जाणवतो. अशीच महाराष्ट्रातल्या खान्देश प्रांतातली एक खास रेसिपी आहे ती म्हणजे खान्देशी शेवेची भाजी. ही भाजी अनेकांना माहित आहे. शेवभाजी ही जाड तिखट शेव वापरून करतात. या भाजीसाठी खास खान्देशी मसाला वापरला जातो. आपल्याकडे खान्देशी मसाला नसेल तर घरात असलेला कोणताही गरम मसाला वापरला तरी चालतो.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

४५ मिनीटं
2 टेबलस्पून

आलं लसूण पेस्ट

2 टीस्पून

लाल तिखट

2 टेबलस्पून

तेल

1 टीस्पून

मोहरी

1/2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

चवीनुसार

मीठ

1/2 टीस्पून

जिरं

1 टीस्पून

बडीशोप

1/2 टीस्पून

काळीमिरी पूड

Cooking instructions

* Step 1

प्रथम कांदा आणि टोमॅटो यांची पेस्ट करुन घ्यावी.
Image step 1 Image step 1

* Step 2

एका कढईत तेल तापल्यावर त्यात मोहरी,हळद आणि हिंग घालावे. मग लाल तिखट घालावे आणि कांदा टोमॅटोचं वाटण घालून व्यवस्थित परतून घ्यावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

मिक्सरमधे डेसिकेटेड कोकोनट,लवंगा,वेलच्या,काळीमिरी पूड,जिरं,बडीशोप घालून मसाला वाटून घ्यावा.
Image step 3 Image step 3

* Step 4

कढईतल्या मिश्रणाला उकळी आल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट आणि वाटलेला ड्राय मसाला घालावा.
Image step 4 Image step 4

* Step 5

सगळं मिश्रण मिक्स करुन व्यवस्थित शिजवून घ्यावं.
Image step 5 Image step 5

* Step 6

आता पाणी आणि मीठ घालून मिश्रण छान उकळू द्या. हि झाली शेवभाजीची ग्रेव्ही तयार. आता जेव्हा सर्व्ह करायचं असेल त्याआधी २-३ मिनीटं ग्रेव्हीमधे शेव घालून शेवभाजी सर्व्ह करावी.
Image step 6 Image step 6 Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic