Home Dish अळूवडी (aluvadi recipe in marathi)

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14 अळूवडी महाराष्ट्रात आणि गुजरातमधे प्रसिद्ध आहे. गुजरातमधे याला पात्रा म्हणतात. कोणत्याही सणासुदीला अळूवडीला पानात डाव्या बाजूला स्थान असतेच. लहानपणापासून मला अळूवडी खूप आवडते. तळताना तिचा चुर्र असा होणारा आवाज खायची इच्छा अजून वाढवतो. मला एकदा अळूवडी करुन बघायची होती. कुकपॅडमुळे संधी मिळाली.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

२० मिनीटं
10 टेबलस्पून

बेसन

2 टेबलस्पून

तांदूळ पीठ

1 टीस्पून

लाल तिखट

1/4 टीस्पून

हळद

1 टीस्पून

जिरेपुड

Cooking instructions

* Step 1

प्रथम अळूची पाने स्वच्छ धुवुन घ्यावीत आणि त्याचे देठ काढून पान उलटे करुन त्यावर हलक्या हाताने लाटणे फिरवून घ्यावे.

* Step 2

एका भांड्यात बेसन, तांदूळ पीठ, हळद, तिखट, जिरेपुड, चिंचगुळाचे मिश्रण,मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण कालवून घ्यावे. मिश्रण खूप पातळ असू नये.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

आता सर्वात मोठे पानं घेऊन त्यावर तयार बेसनाचे मिश्रण लावावे. मग त्यावर पहिल्या पानापेक्षा छोटे पान ठेऊन त्यावर परत बेसनाचे मिश्रण लावावे. अशी ४-५ पाने लावून घ्यावीत आणि मग त्याची वळकटी वळावी.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

आता एका कुकरमधे १ इंच पाणी घालून गरम करुन घ्यावे आणि एका ताटलीला तेल लावून त्यावर तयार अळूच्या पानांच्या वळकट्या ठेऊन १५ -२० मिनीटं वाफवून घ्यावे.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

वाफवलेले उंडे थंड झाल्यावर ते कापून तेलामध्ये तळावेत अथवा शॅलो फ्राय करावेत.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic