Home Dish ज्वारी चे मटकी मोमोज (jwariche matki momos recipe in marathi)

ज्वारी चे मटकी मोमोज (jwariche matki momos recipe in marathi)

Introduce

Chef :

Shilpa Wani

ज्वारी चे मटकी मोमोज (jwariche matki momos recipe in marathi)

#मोमोज #सप्टेंबर मोमोज ची थीम असल्या मुळे मोमोज बनवायचे ठरवले तेही पूर्ण देसी चटणी सगट सगळंच बघूया म्हटलं मुल खातात का आणि आपल्याला ही चव कळेल कारण ना त्यात मैदा नाहीच त्यात ज्या भाज्या घातल्या जातात त्यात आपण कोणत्या ही भाजी च, चिकन, अंड्याच, पनीर च सारण बनवून बघतो पण आज मी मोड आलेल्या मटकीची भाजी घालून बनविले आहे आणि पीठ साठी ही एकदम ग्लूटेन फ्री ज्वारीचं पीठ वापरलं आहे.बनवतांना वाटलं नव्हतं मुल खातील पण आवडलं हुश्श आवडले बाई एकदाचे देसी मोमोज चला तर मग बघुयात ज्वारीचे मटकी मोमोज ची पाककृती.

Ingredient

Food ration :

5 सर्विंग

Cooking time :

45 मिनिटे
1 टेबलस्पून

अद्रक लसूण पेस्ट

1/2 टीस्पून

हळद

1 टीस्पून

मालवणी मसाला

1 टीस्पून

गरम मसाला

1/2 टीस्पून

हिंग

2 टेबलस्पून

तेल

1/2 कप

तीळ

2 टेबल स्पून

दाण्याचा कूट

1/2 टीस्पून

जिरे

1 टीस्पून

लाल तिखट

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यावा मग त्यात हिंग हळद मसाला गरम मसाला घालुन घ्यावा आता त्यात मोड आलेली मटकी घालून परतून घ्यावे थोडं पाणी घालून झाकण ठेवावे आणि मटकी शिजू द्यावी मटकी शिजत आल्यावर मीठ आणि खोबरं घालून एकजीव करून घ्यावे आणि गॅस बंद करून द्यावा.
Image step 1

* Step 2

आता पिठात थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे आता पिठाची पोळी लाटून पुरी एवढ्या आकाराचे कापून घ्यावे.
Image step 2

* Step 3

आता पुरी मध्ये मटकीची भाजी घालून कडा बंद करून घ्याव्या आणि हवा तो आकार द्यावा.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता चाळणीला तेल लावून घ्यावे एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवून चाळणी त्यावर ठेवून आपले तयार मनोज त्याच्यावर ठेवून द्यावे आणि दहा ते बारा मिनिटे वाफवून घ्यावे.
Image step 4 Image step 4

* Step 5

मिक्सरच्या भांड्यात तीळ, लाल तिखट, लसून,जीरे,दाण्याचा कूट आणि मीठ घालून बारीक वाटून घ्यावे थोडं पाणी घालून पेस्ट बनवून घ्यावी.
Image step 5

* Step 6

तयार आहेत ज्वारीचे मटकी मोमोज.
Image step 6

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic