Home Dish बाकरवडी

बाकरवडी

Introduce

Chef :

Shilpa Wani

बाकरवडी

#रेसिपीबुक #week12 बाकरवडी आणि कचोरी खमंग खुसखुशीत अशी महाराष्ट्रातील फेमस बाकरवडी अगदी लहान मुलांचा पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते मधल्या वेळेत खायला संध्याकाळच्या छोट्या-छोट्या भुकेसाठी खायला ही चटपटीत खुसखुशीत बाकरवडी खायला खूप छान लागते तसेच मुलांना डब्यामध्ये खाऊ'साठी द्यायलाही छान झटपट अशी होणारी बाकरवडी ची पाहूयात पाककृती

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी एका भांड्यात मैदा मीठ बेसन आणि गरम तेलाचे मोहन घालून छान एकजीव करून घ्यावे नंतर थोडे थोडे पाणी घेऊन घट्ट पीठ मळून घ्यावे आणि 15 मिनिटे झाकून ठेवून द्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

कढई गरम करून त्यात धने-जिरे बडीसोप थोडे भाजून घ्यावे मग त्यात खसखस घालून भाजून घ्यावे मग खोबरे घालून थोडे तांबूस होईपर्यंत परतून घ्यावे आणि गॅस बंद करून घ्यावा.
Image step 2

* Step 3

आता मिक्सरच्या भांड्यात वरील मिश्रण घालून त्यात लाल तिखट,गरम मसाला, मीठ,साखर आणि पापडी घालून वाटून घ्यावे
Image step 3 Image step 3

* Step 4

Image step 4

* Step 5

आता पिठाची पातळ पोळी लाटून घ्यावी त्या पोळीला चिंचगुळाची चटणी लावून घ्यावी त्यावर वाटलेले मिश्रण घालून सर्वत्र पसरून घ्यावे व त्यावर लाटणे फिरवून घ्यावे हळूहळू रोल करत यावे चाकूच्या सहाय्याने छोटे-छोटे भाग करून घ्यावे व ते सारे हाताने थोडेसे दाबून घ्यावे
Image step 5 Image step 5 Image step 5

* Step 6

आता गरम तेलात मंद आचेवर भाकरवडी खमंग तळून घ्यावी.
Image step 6 Image step 6 Image step 6

* Step 7

बाकरवडी तयार आहे.
Image step 7 Image step 7

* Step 8

Image step 8

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic