Home Dish टोमॅटो पनीर लाडू (tomato paneer ladoo recipe in marathi)

टोमॅटो पनीर लाडू (tomato paneer ladoo recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

टोमॅटो पनीर लाडू (tomato paneer ladoo recipe in marathi)

#लाडू लाडू मुख्यत: पीठ,तूप आणि साखरेपासून बनविलेले असतात. कधी गुळही वापरतात. लाडू बर्‍याच पिठापासून बनवले जातात. कधीकधी शेंगदाणे किंवा सुका मनुका देखील घातले जातात. वापरल्या जाणार्‍या घटकांचा प्रकार रेसिपीनुसार बदलू शकतो. असेच घटक बदलून मी हि रेसिपी केली आहे. टोमॅटो आणि पनीर वापरुन हे लाडू मी केले आहेत. टोमॅटो आणि पनीर दोन्ही शरीरासाठी फायदेशीर आहेत. म्हणून या पदार्थांचा वापर करायचा मी ठरवले. आणि हटके रेसिपी करुया असा विचार केला. बघुया कसे करायचे टोमॅटो पनीर लाडू.

Ingredient

Food ration :

२ सर्विंगज

Cooking time :

३० मिनीटे
४० ग्रॅम

पनीर

२० ग्रॅम

मिल्क पावडर

१५ ग्रॅम

साखर

2 टीस्पून

तुप

2 टीस्पून

तीळ

1 टीस्पून

जायफळ पावडर

Cooking instructions

* Step 1

प्रथम टोमॅटो शिजवून घ्यावेत. आणि गार झाल्यावर साल काढून मिक्सरला फिरवून घ्यावे आणि गाळून घ्यावे.
Image step 1 Image step 1

* Step 2

नंतर एका कढईत तुप घेऊन ते तापल्यावर त्यात टोमॅटो प्युरी घालून परतावे. एक उकळी आली की साखर घालावी. साखर विरघळल्यावर त्यात पनीर घालावे आणि चांगले एकजीव करावे.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

एकीकडे एका छोट्या कढईत तीळ भाजून घ्यावेत.
Image step 3 Image step 3 Image step 3

* Step 4

टोमॅटो आणि पनीरच मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात भाजलेले तीळ आणि मिल्क पावडर घालून ढवळावे.
Image step 4 Image step 4

* Step 5

व्यवस्थित एकत्र झाल्यावर सुकामेवा आणि जायफळ पूड घालावी आणि खायच्या लाल रंगाचा एक थेंब घालून गोळा होईपर्यंत परतावे. थंड झाल्यावर लाडू वळावेत. टोमॅटो पनीर लाडू खायला तयार.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic