Home Dish भरीत कारला मसाला

भरीत कारला मसाला

Introduce

Chef :

Shilpa Wani

भरीत कारला मसाला

#पहिलीरेसिपी पोस्ट दुसरी कारल्याचे भरीत हे छान चटपटीत लागत. चवीला कडू असणारा कारला हा भरून केल्यावर त्याची चव खरंच खूप अप्रतिम लागते, कांदा, खोबरं,कूट, मसाले वापरून बनवले ले चमचमीत कारल्याचे भरीत पाहूया रेसिपी.

Cooking instructions

* Step 1

सर्वात आधी कारले स्वच्छ धुवून हवे असल्यास सोलून मध्ये थोडी चीर पाडून त्यातल्या बिया काढून घ्याव्यात मग कुकर च्या डब्यात कारले, मीठ, अर्ध्या लिंबाचा रस, थोडं पानी घालून 3 शिट्या काढाव्यात.
Image step 1

* Step 2

एका कढईत तेल गरम करावे मग त्यात चिरलेला कांदा गुलाबी होऊ द्यावा, मग त्यात अद्रक लसूण ठेचा टाकून परतून घ्यावा, आता, धने, जिऱ्याची पूड, हळद,मसालाआणि बेसन टाकून परतून घ्यावं, मग कांदा खोबऱ्या च वाटणं (कांदा, खोबरं तव्यावर सोनेरी होई पर्यंत भाजून मग वाटून घ्यावं)घालून परतून घ्यावं, मग दाण्याचं कूट घालून 1 मिनिट परतावं, आता चीनचे कोल, gul, मीठ घालून छान मिक्स करावं आणि गॅस बंद करावं हे मिश्रण एका भांड्यात काढून त्यात कोथिंबीर घालून मिक्स करावं.
Image step 2

* Step 3

आता कुकर मधले कारले काढून त्यातले पानी बाजूला काढून ठेवावे, आता कारल्यात बनवलेलं मिश्रण भरून घ्यावं, तव्या मध्ये थोडं तेल टाकून हे कारले शॅलो फ्राय करून घ्यावे सर्व बाजूने
Image step 3 Image step 3

* Step 4

एका कढईत तेल टाकून राई तडतडू दयावी, मग कांदा परतून घ्यावा, कांदा गुलाबी झाला कि मग, त्यात हळद, मसाला, मीठ (ह्यात हवं असल्यास खोबऱ्या च वाटण ही घालू शकता)घालून मिक्स करावे.कारले वाफवलेले पाणी त्यात घालून मग भरलेले कारले त्यात सोडावे छान मिक्स करून गॅस बंद करावे.
Image step 4 Image step 4

* Step 5

कारल्या चे भरीत तयार आहे हे तुम्ही कोणत्या ही भाकरी, चपाती सोबत सर्व करू शकता.
Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic