Home Dish डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)

डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)

#लंच भारतीय आहारातील अनेक लोकप्रिय पदार्थांपैकी डाळ खिचडी हा सर्वात जास्त खाल्ला जाणारा हेल्दी व टेस्टी पदार्थ आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र शिजवून त्यात आपल्या आवडीनुसार साजूक तूप, भाज्या आणि मसाल्यांचा वापर केला जात असल्यामुळे ही रेसिपी अतिशय सोपी, झटपट होणारी व रुचकर असते. ऋतू बदलताच वातावरणात अनेक बदल दिसून येतात. या बदलांचा परिणाम आपल्या शरीरापासून लाईफस्टाईलपर्यंत सर्वच बाबींवर झालेला दिसून येतो. त्यामुळे ऋतू बदलानुसार आपल्या खानपानात बदल करणंं अत्यंत आवश्यक असतं. एखादी व्यक्ती आजारी पडली की त्या व्यक्तीला हमखास मूगडाळीची खिचडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. कारण अशक्तपणा, अपचनाच्या त्रासात मूगाची खिचडी विशेष लाभदायी ठरते. परंतु, खिचडी ही फक्त आजारी व्यक्तींसाठी फायदेशीर नसून लहानपासून वयस्कर लोकांपर्यंत सर्वांनी याचा आहारात समावेश करणं आवश्यक असतं. पोषक तत्वांसोबतच पचण्यास हलकी असणारी व विशेष तडका देऊन बनवली जाणारी ही खिचडी खूपच रुचकर व स्वादिष्ट लागते.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
1/2 इंच

आलं

1 टीस्पून

गरम मसाला

1/2 टीस्पून

आमचूर पावडर

1 टीस्पून

धणे पावडर

1 टेबलस्पून

साजूक तुप

1 टीस्पून

जिरं

1/2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

प्रथम डाळ आणि तांदूळ धुवून घ्यावेत. नंतर एका पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर गरम करायला ठेवावे. कांदा आणि टोमॅटो चिरुन घ्यावे. आलं लसूण ठेचून घ्यावं.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

दुसर्‍या पातेल्यात तुप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जिरं, कढीपत्ता आणि ठेचलेलं आलं लसूण घालून परतावं. मग त्यात कांदा,हिंग,हळद आणि हिरव्या मिरच्या घालून कांदा मऊ होईपर्यंत परतावे.
Image step 2 Image step 2

* Step 3

मग त्यात टोमॅटो घालावा आणि गरम मसाला, धणे पावडर आणि आमचूर पावडर घालून मिक्स करावं.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता त्यात धुतलेले डाळ आणि तांदूळ घालून परतून त्यात गरम केलेलं पाणी घालावं आणि मीठ घालून एक उकळी आणावी.
Image step 4 Image step 4 Image step 4

* Step 5

मग मंद गॅसवर थोड्या थोड्या वेळाने ढवळत खिचडी होऊ द्यावी. आवश्यक वाटल्यास अजून पाणी घालावं. पूर्ण शिजलं कि झाली डाळखिचडी तयार.
Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic