Home Dish स्टफ्ड पौष्टिक नानखटाई (nankhatai recipe in marathi)

स्टफ्ड पौष्टिक नानखटाई (nankhatai recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

स्टफ्ड पौष्टिक नानखटाई (nankhatai recipe in marathi)

#नानखटाई #सप्टेंबर 16 व्या शतकात नानखटाईची उत्पत्ती सुरत येथे झाली असावी, जेव्हा डच आणि भारतीय हे मसाल्याचे महत्त्वपूर्ण व्यापारी होते. स्थानिक डच रहिवाशांच्या गरजा भागविण्यासाठी एका डच जोडप्याने सूरतमध्ये बेकरीची स्थापना केली. जेव्हा डचांनी भारत सोडला, तेव्हा त्यांनी बेकरी एका इराणीकडे सोपविली. बेकरी बिस्किटे स्थानिकांना आवडत नव्हती. त्याचा व्यवसाय वाचवण्यासाठी त्याने कमी किंमतीत वाळलेल्या ब्रेडची विक्री करण्यास सुरवात केली. हे इतके लोकप्रिय झाले की त्याने भाकरी विकायच्या आधीच सुकायला सुरवात केली. कालांतराने, भाकरीच्या प्रयोगाने शेवटी नानखटाईला जन्म दिला. मी असाच एक पौष्टिक नानखटाईचा प्रयोग केला आहे आणि त्यात स्टफिंग भरलं आहे जेणेकरुन त्याची चव अधिक वाढावी.

Ingredient

Food ration :

४ सर्व्हिंगज

Cooking time :

२० मिनीटं
1 कप

ओट्स

1/4 कप

गुळ

१०० ग्रॅम

साजूक तुप

1/4 कप

तीळ

1/4 कप

खजूर

1 टेबलस्पून

शेंगदाणे

1 टेबलस्पून

काजू

Cooking instructions

* Step 1

एका भांड्यात गुळ, पीठीसाखर आणि साजूक तुप घेऊन ते एकजीव करुन फेटून घ्यावे.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

प्रथम ओट्सची मिक्सरमधे पावडर करुन घ्यावी. आता त्या फेटलेल्या मिश्रणात ज्वारीचं पीठ आणि ओट्सची पावडर घालून व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. आता त्यात तीळ घालून एकत्र करावे आणि व्यवस्थित गोळा करुन घ्यावा.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

स्टफिंगसाठी खजूर, शेंगदाणे आणि काजू मिक्सरमधे बारिक करुन घ्यावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता मळलेल्या पीठाची पारी करुन त्यात खजूराचे स्टफिंग भरावे. आणि पारी बंद करुन त्याला नानखटाईचा आकार द्यावा.
Image step 4 Image step 4

* Step 5

ओव्हन १८०°c ला ५ मिनीटं प्रीहिट करावा. बेकिंग ट्रे ला तुप लावून त्यावर नानखटाई ठेऊन १८०°c ला १० ते १२ मिनीटं बेक करावे. नानखटाई फुलते त्यामुळे बेकिंग ला ठेवताना २ नानखटाईमधे अंतर असावे.
Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic