Home Dish जिलबी (jalebi recipe in marathi)

जिलबी (jalebi recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

जिलबी (jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक # week15 जिलबी हा इराण, तसेच भारतीय उपखंडातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश इत्यादी देशांमध्ये प्रचलित असलेला मिठाईवर्गीय खाद्यपदार्थ आहे. डाळीचे (बेसनाचे) किंवा गव्हाचे आंबवलेले पीठ गोलगोल वेटोळ्यांसारख्या आकारात तेलात सोडून, तळून घेऊन व नंतर साखरेच्या पाकात बुडवून जिलब्या बनवल्या जातात.जलेबी, ज्याला झुलबिया आणि झलाबिया म्हणून ओळखले जाते, हे एक भारतीय गोड आणि लोकप्रिय अन्न आहे जे संपूर्ण दक्षिण आशिया आणि मध्य पूर्वमध्ये आढळते. हे खोल फ्राईंग मैदा पिठात गोलाकार आकारात तयार केले जाते, जे नंतर साखर पाकामध्ये भिजवले जाते. ते विशेषतः भारतीय उपखंड आणि इराणमध्ये लोकप्रिय आहेत. तसं जिलबी कधी मी बनवली नव्हती. कुकपॅडमुळे संधी मिळाली.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

४० मिनीटं
1 कप

बेसन

1/2 कप

मैदा

1/4 कप

दही

1/4 टीस्पून

हळद

2 कप

साखर

1 कप

पाणी

Cooking instructions

* Step 1

एका भांड्यात बेसन, मैदा, हळद आणि दही घेऊन एकत्र करा. आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ भिजवा. मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ असू नये. सर्व एकत्र करुन मिश्रण १५ मिनीटं झाकून ठेवा.
Image step 1 Image step 1 Image step 1

* Step 2

एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊन गॅसवर ठेऊन सतत ढवळत राहावे. उकळत असताना वेलच्या पण घालाव्या. उकळी आल्यावर गॅस बंद करावा.
Image step 2 Image step 2

* Step 3

आता तेल तापत ठेवावे. आणि बेसनाच्या मिश्रणात सोडा घालून ढवळावे आणि साॅसच्या बाटलीत किंवा दुधाच्या पिशवीत भरावे. तेल तापले का चेक करुन त्यात जिलब्या पाडाव्या.
Image step 3 Image step 3

* Step 4

जिलबी तळून झाली कि लगेच पाकात टाकावी. पाक थोडा कोमट असावा म्हणजे जिलबीत पाक लगेच शिरतो.
Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic