Home Dish पनीरची भाजी (paneer chi bhaji recipe in marathi)

पनीरची भाजी (paneer chi bhaji recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

पनीरची भाजी (paneer chi bhaji recipe in marathi)

#लंच पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. पनीरमध्ये प्रोटिन्स असल्याने ऊर्जा हळूहळू वापरली जाते. यामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. तसेच ती झटकन वाढून कमी देखील होत नाही. त्यामुळे पनीर असलेले पदार्थ खाल्याने बराच वेळ भुकेवर नियंत्रण राहते. पनीरमधे प्रोटिनबरोबरच कॅल्शियमही असते. यामुळे दात व हाडे मजबूत होण्यास मदत होते. हा दुग्धजन्य पदार्थ असला तरी पनीरमध्ये दुधापेक्षा जास्त पोषक घटक असतात. परंतु पनीर असलेले पदार्थ खाताना थोडा विचार करावा कारण त्यात कॅलरी जास्त असतात.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
१०० ग्रॅम

पनीर

1 टीस्पून

मोहरी

1 टीस्पून

जिरं

1/2 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

1 टीस्पून

लाल तिखट

1 टेबलस्पून

तेल

चवीनुसार

मीठ

Cooking instructions

* Step 1

एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरं, लसूण, हळद, हिंग आणि लाल तिखट घालून परतावं.
Image step 1

* Step 2

मग त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो आणि मशरुम घालून परतावं. मग त्यात पनीरचे तुकडे घालून छान एकत्र करुन घ्यावं. २ मिनीटं तसचं शिजू द्यावं. मग त्यात थोडं पाणी घालावं. झाकण ठेऊन शिजवावं.
Image step 2 Image step 2 Image step 2

* Step 3

शिजल्यावर त्यात मीठ आणि पावभाजी मसाला घालावा. व्यवस्थित एकत्र करुन वरुन कोथिंबिर भुरभुरवून गरमगरम पनीरची भाजी सर्व्ह करावी.
Image step 3 Image step 3 Image step 3

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic