Home Dish भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

#लंच भेंडी ही भाजी आरोग्यासाठी फारच महत्त्वाची आहे. कारण भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे असतात. भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये अ जीवनसत्व असते. ते आपल्या डोळ्यांना निरोगी ठेवते.भेंडीमध्ये युगेनॉल असते. हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी उपयुक्त असते. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. त्यामुळे डायबिटीस होण्याचा धोका कमी होतो. भेंडीमुळे मेंदूचे कार्य सुरळीत होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते. अशा या बहुगुणी भेंडीची हि वेगळ्या प्रकारची भाजी आज बघुया.

Ingredient

Food ration :

२ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
२५० ग्रॅम

भेंडी

1 टेबलस्पून

दही

2 टीस्पून

शेंगदाणे

1 टीस्पून

तीळ

1 टीस्पून

लाल तिखट

1 टीस्पून

धणे पावडर

1 टीस्पून

जीरे पावडर

2 टीस्पून

कोथिंबिर

चवीनुसार

मीठ

2 टीस्पून

तेल

1 टीस्पून

मोहरी

1/2 टीस्पून

जिरं

1/4 टीस्पून

हळद

1/4 टीस्पून

हिंग

Cooking instructions

* Step 1

प्रथम एका कढईत तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात तमालपत्र, लवंग आणि दालचिनी घालावी. ते परतल्यावर त्यात आलं, लसूण आणि टोमॅटो घालावा.
Image step 1 Image step 1

* Step 2

मग त्यात हिरवी मिरची घालावी. थोडं शिजल्यावर त्यात लाल तिखट आणि धणे जीरे पावडर घालावी.
Image step 2

* Step 3

मिक्सरमधे दही, तीळ, शेंगदाणे,कोथिंबिर आणि लाल तिखट थोडं पाणी घालून वाटून घ्यावं आणि टोमॅटोच्या मिश्रणात हे वाटण घालावं आणि थोडं पाणी घालून शिजवावं.
Image step 3 Image step 3

* Step 4

आता चिरलेली भेंडी त्यात घालावी आणि तळाशी पाणी घालून झाकण ठेऊन शिजवावी. कोथिंबिर घालून पुन्हा एक वाफ आणावी. भेंडी मसाला खायला तयार.
Image step 4 Image step 4 Image step 4

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic