Home Dish पालक पातळ भाजी (palak pathad bhaji recipe in marathi)

पालक पातळ भाजी (palak pathad bhaji recipe in marathi)

Introduce

Chef :

Prachi Phadke Puranik

पालक पातळ भाजी (palak pathad bhaji recipe in marathi)

#लंच पालेभाज्यात अनेक सत्व असतात. मात्र पालेभाज्या खा म्हटलं तर आपलं तोंड वेडवाकडं होतं. निरोगी राहण्यासाठी आपला आहार देखील नीट असायला हवा. डॉक्टर नेहमी आहारात पालेभाज्याचा समावेश करा, असं सांगतात. आपण त्या सल्ल्यांना कधीच गंभीर घेत नाही. पालेभाज्यात सर्वात सत्व असणारी भाजी म्हणजे पालक. आपल्या शरीराला आवश्यक असणारे सगळे घटक पालकमध्ये असतात. ज्यांना वजन कमी करायचे आहे किंवा शाकाहारी जेवण करायचे असेल, त्यांनी पालक खायला हवा. यात ए, बी, सी आणि के या जीवनसत्त्वांसह अनेक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे आठवड्यातून किमान एकदा तरी पालक खाणे आरोग्यदायी आहे. या पालकाची मस्त अशी पातळभाजीची रेसिपी बघुया.

Ingredient

Food ration :

३ सर्व्हिंगज

Cooking time :

३० मिनीटं
2 टीस्पून

शेंगदाणे

1 टीस्पून

चणाडाळ

1 कप

ताक

1 कप

पाणी

चवीनुसार

मीठ

2 टीस्पून

तेल

1/2 टीस्पून

जीरे

1/2 टीस्पून

मोहरी

1/4 टीस्पून

हळद

चिमुटभर

हिंग

Cooking instructions

* Step 1

प्रथम पालक निवडून कुकरमधे शिजवावा. पालकाबरोबर शेंगदाणे आणि चणाडाळ सुद्धा शिजवावी.
Image step 1

* Step 2

एका भांड्यात तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात जीरे, मोहरी घालावी. मोहरी तडतडल्य‍ावर लसूण आणि हिरवी मिरची घालावी.
Image step 2

* Step 3

लसूण आणि मिरची परतल्यावर त्यात हळद आणि हिंग घालावं. मग शिजवलेले डाळ दाणे घालावे.
Image step 3 Image step 3

* Step 4

ते परतल्यावर त्यात शिजवलेला पालक घालून एकत्र करावे. एका पातेल्यात बेसन, ताक आणि पाणी एकत्र करुन घ्यावे. गुठळ्या होऊ देऊ नये.
Image step 4 Image step 4

* Step 5

तयार बेसनाचे मिश्रण पालकाच्या मिश्रणात घालावे. आणि उकळी आणावी. मग मीठ घालून ढवळावे आणि उकळी आल्यावर गॅस बंद करुन गरम भाताबरोबर किंव‍ा भाकरीबरोबर पातळ भाजी सर्व्ह करावी.
Image step 5 Image step 5 Image step 5

Note: if there is a photo you can click to enlarge it

10 Pieces Of Expert Nutrition Advice

1. Start Small

2. Fill Your Plate With Beans and Leafy Greens

3. Focus on Adding—Not Subtracting

4. Taste the Rainbow

5. Prioritize Potassium

6. Eat More Plants

7. Focus on Your Immune System

8. Try the Mediterranean Diet

9. Understand the Impact of Food

10. Guard Your Gut

See more
🇻🇳 Việt Nam 🇺🇸 USA

Copyright © 2024 Cookcic